जालना: खोटे गुन्हे दाखल करून खंडणी उकळत असल्याचा आरोप
पीडित महिलेचा २१ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
Jalna, Jalna | Sep 19, 2026 भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आर्थिक लूट व दहशत निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप अश्विनी खंडागळे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनानुसार, सुनिता काकफळे यांनी मागील पाच महिन्यांत भोकरदन पोलीस ठाण्यात तीन विनयभंगाचे आणि एका बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून