मानगाव: वाहतूककोंडीने प्रवाशांना बसले उन्हाचे चटके
Mangaon, Raigad | May 31, 2026 माणगाव शहर आणि परिसरात रविवारी पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीचा सामना प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना करावा लागला. माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम अद्याप अपूर्ण असल्याने निर्माण झालेल्या वाहतूक समस्येने हजारो वाहन धारक अक्षरशः तासन्तास रस्त्यावर अडकून पडले होते. कडक उन्हात वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले असून शासन आणि संबंधित ठेकेदारांच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.