नागपूर शहर: अनैतिक संबंधाच्या संशयातून सदरमध्ये थरार; युवकावर जीवघेणा हल्ला: राहुल तारसे, पोलीस निरीक्षक
सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तारसे यांनी 12 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसारशहराच्या गजबजलेल्या सदर भागातील व्हीसीए चौकात असलेल्या 'मोहब्बत चाय सेंटर' जवळ रक्ताचा थरार पाहायला मिळाला. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून एका माथेफिरूने एका युवकावर नारळ कापण्याच्या चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत बीच-बचाव करण्यासाठी आलेला आणखी एक जण जखमी झाला असून, परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक राहुल तारसे यांनी दिली आहे.