जालना: जालना शहरातील गणेश विसर्जन सोहळा शांततेत; 519 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींसह 70 ते 80 हजार घरगुती गणेश मुर्तीचे विस
Jalna, Jalna | Sep 26, 2026 जालना शहरातील श्री गणेश विसर्जन सोहळा शांततापूर्ण आणि सुरळीत वातावरणात संपन्न झाला. मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जालना शहर महानगरपालिकेने केलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे तब्बल 34 तास सुरू असलेली विसर्जन प्रक्रिया कोणताही मोठा अनुचित प्रकार न घडता पूर्ण झाली. दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू झालेली विसर्जन प्रक्रिया दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती. या कालावधीत शहरातील एकूण 519 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.