घनसावंगी: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 13 लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल 13 लाख रुपये किमतीचे 1 हजार 903 लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तीर्थपुरी येथील मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनावर अचानक छापा टाकला. तपासादरम्यान तूप निर्मितीमध्ये खाद्यतेल व विविध इसेन्सचा वापर करून भेसळ केली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात तयार तूप व उत्पादनासाठी वापरण्यात येणारा साठा जप्त करण्यात आला. संबंधित आस्थापनाला