पनवेल: शाळेतील 'गुड टच-बॅड टच'च्या धड्यामुळे नराधमाचे कृत्य उघड
Panvel, Raigad | May 8, 2026 शाळेत शिक्षिकेने दिलेल्या 'गुड टच आणि बॅड टच'च्या माहितीमुळे एका नराधमाचे संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे. तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी आरोपी पंकज अजयसिंग सिंग (२८, रा. कामोठे, सेक्टर १५) याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात ४ मे रोजी 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.