नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि येणारे वर्ष सुख-समृद्धीचे जावो, या प्रार्थनेसाठी आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आज दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटे 5 पासूनच दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या. 2026 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या जागृत देवस्थानचे दर्शन घेण्याची परंपरा कल्याणकर श्रद्धेने पाळतात. आज सकाळपासूनच कल्याण शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक सहकुटुंब गडावर दाखल झाले.