नागपूर शहर: ५० किलो गांजासह ट्रक जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सारंग मिराशी पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांनी 1 जुलै ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका मोठ्या कारवाईत ५० किलो ५६० ग्रॅम गांजा आणि ट्रकसह एकूण २७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा-नागपूर महामार्गावर उमिया कॉम्प्लेक्सजवळ सापळा रचून पोलिसांनी मोहम्मद अलाउद्दीन मलिक या आरोपीला अटक केली. हा गांजा ओडिशाहून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, पोलिस आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक सार