नागपूर शहर: भंडारा रोडवर एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर
भंडारा रोडवर मुख्य रस्त्यावर एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव एसटी बस आणि कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत कारचा पार चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील आणि वरील भाग पूर्णपणे चेपला गेला असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.