मोर्शी: सिंभोरा येथील धरणा जवळील नदीपात्रात उडी घेऊन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, उपस्थितांनी वाचविले प्राण
दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सप्टेंबर रोजी सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणा जवळील नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाचे धरण परिसरातील उपस्थितांनी प्राण वाचविले असून, नाका तोंडात पाणी गेल्याने बेशुद्ध झालेल्या युवकाला तात्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन युवकांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे कळते