समुद्रपूर: चाकूर शिवारात विज पडून बैल ठार: सुदैवाने तिन बैल थोडक्यात बचावले: शेतकऱ्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान
समुद्रपुर तालुक्यातील अनेक भागात विजेच्या कळकळासह बरसलेल्या मानसुनपुर्व पावसात चाकुर शिवारात शेतातील निंबाच्या झाडाखाली बांधून असलेल्या ४ बैला पैकी एक बैल पडून जागीच ठार झाला तर सुदैवाने तिन बैल थोडक्यात बचावले .प्राप्त माहितीनुसार गुरुवारी ६ जुन रोजी १ वाजताच्या सुमारास समुद्रपुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेच्या कळकळासह मानसुपर्व पावसाने हजेरी लावली यावेळी चाकूर गावात वादळाने अरुण झाटे, भैय्या शेख सह काही घराचे छत उडून नुकसान झाले.शेतकरी नानाजी वारलू ठाकरे यांचा बैल ठार झाला.