समुद्रपूर: मनुष्य निर्सागाची सांगड घातल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही ठाणेदार संदिप गाडे :मोहगांव रोपवाटिकेत प्रतिपादन
समुद्रपुर :मानसाला ऑक्सिजनची जी गरज आहे ती फक्त वृक्षातून मिळते तरी सर्वांनी वृक्ष तोडताना दहा वेळा विचार करावा वृक्ष हा मानसाचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा मित्र आहे.सर्वांनी झाडे लावा निर्सगावर प्रेम करा सर्वांनी मनुष्य आणि निर्सागाची सांगड घालून काम केल्यास पर्यावरणाचा रास होणार नाही व येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत आज बुधवारी ५ जुन रोजी ११ वाजता गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदिप गाडे यांनी मोहगांव येथिल रोप वाटीकेत जागतिक पर्यावरण दिनाच्या आयोजना प्रसंगी व्यक्त केले.