महागाव: तालुक्यातील सातघरी शिवारात बिबट्याचा हल्ला; ४ जण जखमी
महागाव तालुक्यातील काळी दौलत वनपरिक्षेत्रातील गुंज वर्तुळात सातघरी शेतशिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ शेतकरी व शेतमजूर जखमी झाल्याची घटना आज (२६ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मोहदी येथील शेतकरी प्रकाश नामदेव धाडवे (४५), बबन मारोतराव धाडवे (५५), लिलाबाई नरसिंग चव्हाण (६०) तसेच सातघरी येथील अंकुश मोतीराम जाधव (२५) यांच्यावर बिबट्याने हल्ला करून पाय व पोटरीला चावल्याचे समोर आले आहे.