भडगाव: पारोळा चौफुली वरील न्यू मिलन चहा हॉटेल दुकानात झालेल्या सिलेंडर स्फ़ोटात हॉटेल मालकाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू,
भडगाव शहरातील पारोळा चौफुली वरील न्यू मिलन चहा हॉटेल दुकानात सिलेंडर स्फ़ोट झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली होती. यात 12 इसम जखमी झाले होते. यातील जखमीवर उपचार सुरु होते. तर यातील याच न्यू मिलन चहा हॉटेलचे मालक यांचा मुलगा शेख सोहेल शेख रफिक मणियार हा गंभीर रित्या भाजला गेल्याने त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरु असताना प्रकुर्ती खाल्यवल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हालवण्यात आले होते.