जालना: दिव्यांग कल्याणासाठी दीड कोटींपेक्षा अधिक निधी द्या : नगरसेविका अॅड. रिमा काळे-खरात सभागृहात आक्रमक
Jalna, Jalna | Mar 30, 2026 आज दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांग कल्याणासाठी दीड कोटींची तरतूद जालना महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झाला असून, या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या कल्याणासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ही तरतूद अपुरी असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी यापेक्षा अधिक निधी राखीव ठेवावा, अशी जोरदार मागणी नगरसेविका अॅड. रिमा काळे-खरात यांनी सभागृहात केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अॅड. रिमा काळ