अलिबाग: मोरा-मुंबई रो-रो सेवा पुन्हा रखडली
Alibag, Raigad | May 8, 2026 बंदर ते मुंबईच्या भाऊचा धक्का दरम्यानच्या 75 कोटी खर्चाचे मोरा रो-रो सेवेचे अनेक वर्षे रखडलेले काम आता एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र एप्रिल 2026 चा मुहूर्तही आता टळला आहे. उरणहून मुंबईपर्यंत जलसेवा सुरूच आहे. मात्र या मार्गाने वाहन घेऊन प्रवास करता यावा याकरिता रो रो सेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. गेले अनेक महिने रखडलेले हे काम हे काम एप्रिल 2026 ला पूर्ण करण्यात येणार होते.