नागपूर शहर: सावरकर नगर चौकात ट्रॅफिक पोलिसावर हल्ला; दुचाकीस्वार महिला आणि तरुणावर गुन्हा दाखल
सावरकर नगर चौकात ट्रॅफिक ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदारावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित दुचाकीस्वार महिला आणि तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लायसन्स मागितल्यावर गाडीवर मागे बसलेल्या महिलेने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.