भद्रावती शहरातील देवालय सोसायटीत राहणारे तनुज पंडीले हे आपल्या कुटुंबासह लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील नगदी साडेतीन लाख रुपये व सोन्याचे ब्रेसलेट लंपास केले. सदर घटना दिनांक १८ रोज गुरुवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात करण्यात आली असुन पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.