तुमसर: नवरगाव येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या आरोपी दारू विक्रेत्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे दि. 19 सप्टेंबर रोज शुक्रवारला सायं.6 वाजता च्या सुमारास तुमसर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी दारू विक्रेता रोशन रविशंकर कामठे याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातून प्लास्टिक बॉटलमध्ये ठेवलेली 8 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.