नागपूर शहर: पंतप्रधान यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन,इंधन जपून वापरा; देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन
रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना इंधन आणि गॅसचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत जे मार्गदर्शन केले आहे, ते अत्यंत योग्य आणि काळाची गरज आहे.