पनवेल: विदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना पावणेदोन कोटींचा गंडा
Panvel, Raigad | Jun 22, 2026 विदेशात शिपिंग कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अनेक बेरोजगार तरुणांची तब्बल १ कोटी ७३ लाख ८१ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खारघर येथील अव्हॉन नेव्हिगॉर्ड्स मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर-७ येथील कार्यालयातून संबंधित कंपनीकडून मलेशिया तसेच इतर देशांमध्ये शिपिंग क्षेत्रात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते.