ठाणे: तर...आम्ही सर्व वाहने फोडून टाकू, मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा, नेमकं कारण काय?
Thane, Thane | Sep 16, 2025 ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्यामुळे ठिकठिकाणी आंदोलने केली जातात. मात्र ही समस्या सुटलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रात्री बारा च्या अगोदर अवजड वाहनांना प्रवेश प्रवेश देऊ नका असे आदेश दिलेले असताना देखील प्रशासन त्यांचे आदेश पाळत नाही. त्यामुळे यापुढे आम्ही उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार,जर बाराच्या अगोदर अवजड वाहने आम्हाला शहरात दिसली तर ती आम्ही फोडून टाकू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.