जालना: चाकू गळ्याला लावून इंजिनिअरला बेदम मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा;चांदीची चैन, हेडफोन व दोन हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप
Jalna, Jalna | Jul 8, 2026 एका खाजगी कंपनीच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणार्या 26 वर्षीय इंजिनिअरच्या गळ्याला चाकू लावून चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना इंदेवाडी परिसरातील ससश्रुंगी नगर येथे घडली. हल्लेखोरांनी इंजिनिअरच्या गळ्यातील चांदीची चैन, हेडफोन आणि दोन हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. बुधवार दि. 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. विवेक कुमार सिंग रा.ससश्रुंगी नगर,इंदेवाडी, जालना यांना मारहाण झाली.