नागपूर शहर: "संजय राऊत हेच शिवसेनेच्या दुरवस्थेला जबाबदार"; आशिष जैस्वाल यांचा घणाघात
शिवसेनेतील (शिंदे गट) बंडखोरी आणि आगामी राजकीय घडामोडींवर राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत बंडावर प्रतिक्रिया देताना जैस्वाल म्हणाले की, "आम्ही परिस्थितीवर 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत आहोत. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, परंतु जे बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहेत आणि आमच्यासोबत येऊ इच्छितात, त्यांचे आम्ही स्वागतच करू."