घनसावंगी: कचेरी रोडवरील वटवृक्ष संस्थानाला जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी केले दर्शन; ‘चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’ अ
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जालना शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी कचेरी रोडवरील वटवृक्ष संस्थानाला येथे जाऊन श्री मारुतीरायांचे विधिवत दर्शन व पूजा केली. कचेरी रोडवरील वटवृक्ष संस्थान देवस्थानाचे पुजारी विनायक महाराज फुलंब्रीकर व विजय महाराज फुलंब्रीकर यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी