जालना: मंगळबाजार परिसरात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; तीन आरोपी ताब्यात
Jalna, Jalna | Sep 30, 2026 जालना शहरातील मंगळबाजार परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत मटका बुक्की, मोबाईल संच आणि रोख रकमेसह एकूण ५१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवार दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.