नागपूर शहर: पंचशील चौकात मनपा बस आणि स्कूल बसची धडक; ४ विद्यार्थी जखमी
: शहरातील वर्दळीच्या पंचशील चौकात आज सकाळी ७:३० च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. नागपूर महानगरपालिकेच्या बसने एका स्कूल बसला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत ४ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.