लातूर : आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने गंगापूर गणासाठी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. गंगापूर येथील रहिवासी सौ. संध्या शाम सूर्यवंशी यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ही घोषणा आम आदमी पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे.