आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन राजुर या मुख्य रोडवर नांजा फाट्यावर मालवाहू करणाऱ्या बोलेरो पिकप चा भीषण अपघात झाला आहे,अपघात एवढा भीषण होता की बोलेरो पिकप चे समोरील टायर तुटून पडल्याने अपघात झाला व बोलेरो पिकप ही मुख्य रोडवरच पलटली यामुळे काही काळ वाहत सुद्धा ठप्प झाली होती मात्र नंतर सुरळीत झाली या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली मात्र चालक गंभीर जखमी आहे.