लातूर -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या नेतृत्वात व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हा समन्वयकांची जिल्हावार नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात नांदेड शहर व ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी प्रदेश सरचिटणीस अँड व्यकटराव भगवानराव बेंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.