औंढा नागनाथ: पोलीस ठाणे हद्दीत गोळेगाव सह आठ ठिकाणी पोलिसांची अवैध देशी दारू विक्रीवर धडक कारवाई; दारूचा मोठा मुद्देमाल जप्त
औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीत लपून चोरून अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या विरुद्ध पो नि जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत धारखेडा,रुपुर तांडा, तामटी तांडा, गोळेगाव, जवळा बाजार, सोनवाडी,पिंपळदरी,सह आठ ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत १११ देशी दारू बॉटल ज्याची किंमत ७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जनावर ११ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला पुढे कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोनि राहिरे यांनी १२ ऑक्टोबर सायंकाळी साडेसहाला सांगितले