औंढा नागनाथ तालुक्यातील बर्गेवाडी येथील ऊसतोड मजूर बंडू गलसिंग जाधव यांच्या घराला दिनांक 11 डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी अचानक आग लागून आगीत संसार उपयोगी साहित्य,अन्नधान्य, सोयाबीन व इलेक्ट्रिक वस्तू जळून मोठे नुकसान झाले होते या दरम्यान या घटनेची माहिती कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर कळताच त्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत माथा येथील पांडुरंग गीते, सरपंच हनुमान रिठे उपसरपंच बाळू कुटे यांच्या मार्फत ऊसतोड मजूर बंडू जाधव यांना तात्काळ दिनांक 12 डिसेंबर शुक्रवारी दुपारी दोन वाजे दरम्यान आर्थिक मदत दिली