नागपूर शहर: नागपुरात दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; ३ महागड्या गाड्या जप्त : विठ्ठल सिंग राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांनी दोन एप्रिल ला रात्री सात वाजता दिलेल्या माहितीनुसार,सीताबर्डी पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यामध्ये एक महागडी 'रॉयल एनफिल्ड' आणि दोन 'अॅक्टिव्हा' गाड्यांचा समावेश असून, एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेकडी रोड परिसरातील एका चोरीच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना ताब्यात घे