जिंतूर तालुक्यातील मौजे घडोळी तांडा शिवारातील पूर्णा नदी पात्रातून अवैध रित्या शासनाचा महसूल बुडवून विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करणारा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH 22 AM 3880 हा ट्रॉलीसह एकूण 8 लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर घरजाळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालका विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 48 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.