भंडारा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या रस्ते बांधकामाची आज, १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान म्हाडा कॉलनीतील नागरिक शिंदे यांनी नगराध्यक्षांकडे परिसरातील कामाबाबत काही तक्रारी मांडल्या. या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे ठोस आश्वासन नागरिकांना दिले. कामाचा दर्जा आणि गती याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला आवश्य