जिल्ह्यातील महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाचे असलेले ग्राम महसूल अधिकारी तलाठी आणि मंडळाधिकारी आज सोमवार १५ डिसेंबर पासून संपावर गेले आहेत. नागरिकांना तातडीने ऑनलाईन सेवा प्रदान करण्यासाठी लँपटॉप प्रिंटर आणि इतर संबंधित साधनसामुग्री तातडीने पुरवठा करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र डिएसएससी प्रशासनाकडे जमा करून संप पुकारला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व कामकाज ठप्प झाले आहे.