हातकणंगले: माणगाव खून प्रकरणात संशयित आरोपी बेडकिहाळमध्ये हातकणंगले पोलिसांच्या जाळ्यात
हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण लगमार याला बेडकिहाळ येथे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे न्यायाच्या दिशेने मोठा टप्पा गाठण्यात आला आहे.