नागपूर शहर: छावणी चौकात बस कंडक्टरची दादागिरी; युवक व कंडक्टरच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
नागपूरच्या छावणी चौकातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका बस कंडक्टरने बसमधून उतरून एका वृद्ध व्यक्ती आणि एका तरुणीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.