लाखांदूर शहरात पेट्रोल डिझेल साठी अलोट गर्दी शेतीची कामे रखडली विद्यार्थी व पालक हवालदिल
लाखांदूर शहरात सह संपूर्ण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे इंधनासाठी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या अलोट गर्दी झाले असून तारीख 19 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपासून तर रात्री साडेदहा वाजता पर्यंत गर्दी उचलत होती यामुळे शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे