अलिबाग: मुरूडमध्ये नवाबांच्या 4,500 एकर जमिनीवरून वाद पेटला
सीलिंग कायद्याच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचा आरोप
Alibag, Raigad | Oct 16, 2025 सर्वोच्च न्यायालयाच्या वकिल सोनिया राज सूद यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांवर सीलिंग कायदा लागू करण्यात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुरूड जंजिरा येथील माजी नवाबांच्या सुमारे 4,500 एकर जमिनीवर महाराष्ट्र कृषी जमीन मर्यादा कायदा लागू करावा, अशी त्यांची पत्रकार परिषदेत मागणी होती.