बोदवड: मेळसांगवे या गावातून एक ४५ वर्षीय इसम झाला बेपत्ता, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Sep 27, 2025 मेळसांगवे या गावातील रहिवासी भगवान दत्तू सोनटक्के वय ४५ हा इसम आपल्या घरी होता. तो आपल्या घरी सांगून गेला की मी हनुमान मंदिरावर माझी चप्पल राहून गेली आहे ती घेऊन येतो. तेव्हापासून घराच्या बाहेर गेलेला हा इसम नंतर घरी परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला. मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.