नागपूर शहर: कारागृहातून बाहेर येताच आरोपी झाले सक्रिय, दोघांना अटक : राहुल मदने पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 26 जूनला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,पाचपावली पोलिसांनी सेंधमारीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा करत यश बनसोड आणि अंशुल वाकडे या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ६३,९९,४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी लश्करीबाग परिसरातील चोरीची कबुली दिली. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे