नागपूर शहर: महिलांची छेडछाड करणाऱ्या विकृताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १० गुन्हे उघड : पंकज बोंडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोन्डसे 12 एप्रिल ला दुपारी 05:30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातील विविध भागांत महिला आणि विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात अंबाझरी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका विकृत प्रवृत्तीचा पर्दाफाश झाला आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी दिली आहे.