नागपूर शहर: पाचपावलीत गोवंशाची सुटका; मुख्य आरोपी शाकिब कुरैशीविरुद्ध गुन्हा दाखल: अनिरुद्ध पुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी 29 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी बुद्ध नगर येथील एका टिन शेडवर छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने क्रूरतेने बांधून ठेवलेल्या गोवंशाची सुटका केली.या कारवाईत पोलिसांनी २ लाख ३० हजार रुपये किमतीचे गोवंश जप्त केले असून, त्यांना सुरक्षितपणे धंतोली येथील गोरक्षणमध्ये पाठवण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी दिली आहे.