नागपूर शहर: दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली आदरांजली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज नागपुरातील पवित्र दीक्षाभूमी येथे उत्साहाचे वातावरण होते. महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्या वतीनेही महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.