तुमसर: शहरातील शारदा विद्यालयाजवळ 'चव्वनी' उर्फ 'मोती'चा मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन
तुमसर शहरातील शारदा विद्यालयाजवळील भिंतीजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. स्थानिक लोक त्याला 'चव्वनी' किंवा 'मोती' या नावाने ओळखत असले, तरी त्याची खरी ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. घटनेची माहिती पोलिसांना २३ सप्टेंबर रोजी सायं. ६.४५ च्या सुमारास एका व्यक्तीच्या पडल्याची माहिती मिळाली. तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे दाखल केले.