सेनगाव: पुसेगांव येथे सायबर सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन,सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे यांनी केले मार्गदर्शन
नरसी नामदेव पोलीस स्टेशनच्या वतीने सेनगांव तालुक्यातील पुसेगांव येथे सायबर सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नरसी नामदेव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुसेगांव येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आज सदरचा कार्यक्रम पार पडून याप्रसंगी अत्यंत संवेदनशील असणाऱ्या सायबर सिक्युरिटी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.