कागल: ननदी येथे सचिन पुजारी व बाबूराव डोने वाघापुरे यांच्या उपस्थित श्री हालसिद्धनाथांची भाकणूक संपन्न
मेघराज बांदा आड बांध, आडद्रा शेवट पेरणी,धनधान्य जपा मेघ राजाची वाट बघशीला,2024 मध्ये माणसाचे जगणे मुश्किल होईल, उन्हाळ्यापासून मृत्यू होईल, प्रलय काल येईल,जनावरांना जपा जगात मोठी घडामोड होईल.ननदी येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथांची भाकणूक आज बुधवारी पहाटे पाच वाजता सचिन पुजारी व बाबूराव डोने वाघापुरे यांच्याकडून नंदिकर सरकार यांच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या साक्षीने नाथांची भाकणूक वर्तविण्यात आली.यावेळी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.