डहाणू: पालघरात ६३ लाखांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मुद्देमाल जप्त
पालघरच्या चारोटी टोलनाक्यावर २ आणि ३ ऑक्टोबर रोजी प्रतिबंधित अन्नपदार्थ व मालवाहू वाहनांची मोठी कारवाई झाली. ६३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, फिरोज खाजा मिया सय्यद यांच्यासह ७ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.