नागपूर शहर: महसूल विभागात ३५,६०० पदांच्या आकृतीबंधास मंजुरी; राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये होणार
राज्य शासनाने महसूल विभागाच्या सक्षमीकरणासाठी एक मोठा निर्णय घेतला असून, तब्बल ३५ हजार ६०० पदांचा आकृतीबंध मंजूर केला आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येणार असून महसूल यंत्रणेचा विस्तार होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली.